खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना: मोठी सुवर्णसंधी! अनुदानावर प्रमाणित बियाणे अर्ज सुरू

खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्रता, कागदपत्रे, अर्ज पद्धत आणि अंतिम तारीख जाणून घ्या.

खरीप हंगाम 2026 साठी महाडीबीटी पोर्टल बियाणे योजना माहिती

         मित्रानो शेतकर्यासाठी आनंदाची बातमी  खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना सुरु झाली आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळावे आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

  महाडीबीटी पोर्टलवरून शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.पात्र लाभार्थ्यांना सोयाबीन,तूर,मूग,उडीद,कापूस, मका आणि इतर पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर अनुदान दिले जाते.

खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना म्हणजे काय?

         खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना ही महाराष्ट्र शासनाची शेतकरी हिताची योजना आहे. या अंतर्गत प्रमाणित व गुणवत्तापूर्ण बियाणे कमी दरात उपलब्ध करून दिले जातात. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत न देता बियाण्यांवर अनुदान दिले जाते.

योजनेचे मुख्य फायदे

  • शेतकर्यांना प्रमाणित बियाणे अनुदानित दरात.
  • प्रमाणित बियाणे असल्यामुळे पीक उत्पादनात वाढ.
  • अनुदान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी.
  • महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
  • थेट लाभार्थी निवड.

कोणती बियाणे उपलब्ध आहेत?

या योजनेत खालील पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे:

  • सोयाबीन
  • तूर
  • मूग
  • उडीद
  • मका
  • कापूस
  • ज्वारी
  • बाजरी

आवश्यक कागदपत्रे

खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना साठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड.
  • फार्मर आयडी.
  • 7/12 उतारा.
  • 8A उतारा.
  • बँक पासबुक.
  • मोबाईल नंबर.
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलला भेट द्या.
  2. फार्मर आयडी नंबर टाकून शेतकरी नोंदणी करा.
  3. लॉगिन करून बियाणे वितरण प्रात्यक्षिक,फेल्क्सी घटक,बियाणे आणि औषधे ही कृषी योजना निवडा.
  4. आवश्यक माहिती भरा.
  5. माहिती भरून झाल्यावर चलन फिस भरा आणि अर्ज सबमिट करा.

अर्जाची अंतिम तारीख

  • 15 मे 2026 अंतिम मुदत आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. महाडीबीटी बियाणे योजना 2026 साठी अर्ज कुठे करायचा?

  महाडीबीटीच्या अधिकृत https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

2. या योजनेत कोणत्या पिकांसाठी बियाणे मिळतात?

सोयाबीन,कापूस,मूग,उडीद,तूर आणि इतर खरीप पिकांसाठी.

3. वैयक्तिक शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते?

40% ते 50% पर्यंत अनुदान मिळते.

4. शेतकरी गटांना किती लाभ मिळतो?

पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदान मिळते.

खरीप हंगाम 2026 महाडीबीटी बियाणे योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळाल्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

दररोज नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

This is a sample heading description.
Scroll to Top