११ वी केंद्रीय प्रवेश २०२६ (FYJC Admission 2026): ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती.

११ वी प्रवेश २०२६ FYJC Admission Maharashtra online अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती

       महाराष्ट्रातील दहावी (SSC/CBSE/ICSE) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ११ वी प्रवेश (FYJC Admission 2026) ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.दरवर्षी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते.पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक गोंधळून जातात.त्यामुळे आपण या ब्लॉग मध्ये अर्ज प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

FYJC Admission 2026 म्हणजे काय?

       FYJC म्हणजे First Year Junior College (११ वी प्रवेश). दहावी नंतर विद्यार्थ्यांना Arts, Commerce, Science या शाखांमध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत केंद्रीकृत पद्धतीने (Centralized Admission Process – CAP) केली जाते.

११ वी प्रवेश २०२६ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

११ वीचे प्रवेश (FYJC Admission) हे पूर्णपणे ऑनलाइन आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी  खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

  1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.FYJC Admission साठी अधिकृत पोर्टलवर जा (FYJC admission portal).
  2. नवीन नोंदणी (Registration) वर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्ही दहावी महारष्ट्र राज्यात केली आहे इतर राज्यात ते निवडा.
  4. तुम्ही फ्रेशर,रिपिटर आहात ते निवडा.
  5. त्यानंतर तुम्ही दहावी ज्या बोर्डातून पास झाले किवा पेपर दिले आहेत ते निवडा.
  6. त्यानंतर तुमची दहावीची माहिती भरा.जस कि तुमचे पूर्ण नाव ,बैठक क्रमांक,दहावीच वर्ष,इ.माहिती भरा.
  7. त्यानंतर एक सेक्यूरीटी प्रश्नाच उत्तर सेट करा.(पासवर्ड रिसेट करण्यासाठी आवश्यक).
  8. त्यानंतर पासवर्ड सेट करून कॅप्चा कोड टाकून नोंदणी करा.
  9. नोंदणी झाल्यावर  लॉगिन करून अर्ज भरा.
  10. अर्ज भरताना  वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख) शैक्षणिक माहिती (SSC Marks, Board).आरक्षण (Category) माहिती काळजीपूर्वक टाका.
  11. कॉलेज निवड (College Preference) करताना तुमच्या आवडीनुसार 10 ते 15 कॉलेज निवडा.
  12. त्यानंतर  सर्व आवश्यक डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा.
  13. शेवटी अर्ज पूर्ण भरल्यावर सर्व माहिती तपासा आणि  सबमिट करा व 
  14. प्रिंटआउट घ्या.

आवश्यक कागदपत्रांची यादी

FYJC Admission साठी खालील डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत:

✔️ दहावीचा मार्कशीट.
✔️ शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate).
✔️ जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
✔️ Non-Creamy Layer Certificate (OBC विद्यार्थ्यांसाठी).
✔️ उत्पन्न प्रमाणपत्र.
✔️ आधार कार्ड.
✔️ पासपोर्ट साईज फोटो.
✔️ रहिवासी दाखला.

प्रवेश प्रक्रिया राउंड

FYJC Admission मध्ये साधारणपणे 3 ते 4 राउंड घेतले जातात:

  1.   पहिला राउंड :अर्ज भरल्यावर पहिली यादी प्रसिद्ध होते.पहिल्या यादीत मेरिटनुसार कॉलेज मिळते.पहिल्या राउंड मध्ये तुम्ही निवडलेल्या कॉलेज मध्ये नंबर लागला तर प्रवेश निश्चित करायचा.
  2. दुसरा राउंड : पहिल्या राउंड मध्ये नंबर लागला नसेल तर दुसरा राउंड साठी पुन्हा कॉलेज निवडून अर्ज सबमिट करायचा.
  3. तिसरा राउंड :सर्व उर्वरित कॉलेज मधील शिल्लक सीट्ससाठी.

 

मेरिट लिस्ट कशी तयार होते?

FYJC Merit List खालील घटकांवर आधारित असते:

  • SSC (10th) चे टक्केवारी.
  • Category (आरक्षण).
  • निवडलेले कॉलेज.
  • उपलब्ध सीट्स.

👉 जास्त टक्केवारी = चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त.

संभाव्य महत्वाच्या तारखा

  • Registration Start: 10 एप्रिल  2026 ते ३० एप्रिल २०२६.

👉 वेळोवेळी नवीन अपडेट्स साठी वेबसाइट तपासा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. FYJC Admission साठी अर्ज फी आहे का?

👉 काही वेळा Nominal Fee असते (शासनाच्या नियमानुसार)

2. Offline Admission मिळू शकते का?

👉 नाही, प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे

3. एकापेक्षा जास्त कॉलेज निवडू शकतो का?

👉 हो, 10–15 कॉलेज निवडू शकता

            ११ वी प्रवेश २०२६ ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्वाची पायरी आहे. योग्य माहिती, योग्य कागदपत्रे आणि वेळेत अर्ज केल्यास तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे अर्ज प्रक्रिया काळजीपूर्वक पूर्ण करा आणि सर्व अपडेट्स नियमित तपासत रहा.

दररोज नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

This is a sample heading description.
Scroll to Top