प्रत्येक व्यक्तीच स्वप्न असत की आपल स्वतःचे पक्के घर असाव. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही.अशा कुटुंबांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) सुरू केली आहे.या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब,बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे.2026 मध्येही ही योजना मोठ्या प्रमाणात सुरू असून पात्र लाभार्थ्यांना ₹2,10,000 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.विशेष म्हणजे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाते.
या ब्लोग मध्ये आपण PMAY-G 2026 ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) म्हणजे काय?
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची घरकुल योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.पूर्वी ही योजना इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जात होती.नंतर तिचे नाव बदलून PMAY-G करण्यात आले.
या योजनेचा उद्देश आहे:
- ग्रामीण भागातील कुटुंबाला सुरक्षित पक्के घर असावे.
- स्वच्छ आणि सन्मानजनक जीवन जगता यावे.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबांना मदत.
PMAY-G 2026 अंतर्गत मिळणारे लाभ
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणयोजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते.
अनुदान वितरण तपशील
1. पाया खोदकामासाठी (Plinth Level).
₹15,000/- घराच्या पायाभरणीसाठी ही पहिली रक्कम दिली जाते.
2. लिंटल पातळीपर्यंत (Lintel Level).
₹70,000/-भिंती व बांधकाम लिंटल स्तरापर्यंत पूर्ण झाल्यावर ही रक्कम दिली जाते.
3. स्लॅब पातळीवर (Slab Level).
₹30,000/-छताचे काम किंवा स्लॅब पूर्ण झाल्यानंतर पुढील अनुदान दिले जाते.
4. अतिरिक्त वाढीव निधी.
₹50,000/-घर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आर्थिक सहाय्य.
5. मनरेगा मजुरी (95 दिवस)
₹26,730/-MGNREGA अंतर्गत मजुरीचे अतिरिक्त लाभ.
6. शौचालय प्रोत्साहन.
₹12,000/-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय बांधकामासाठी.
एकूण लाभ.
₹2,10,000/- पर्यंत.
PMAY-G 2026 साठी पात्रता
लाभार्थी कोण असू शकतात?
- ग्रामीण भागातील रहिवासी.
- बेघर कुटुंब.
- कच्च्या घरात राहणारे.
- एक किंवा दोन खोल्यांचे कमजोर घर असलेले.
- BPL कुटुंब.
- अनुसूचित जाती / जमाती.
- महिला प्रमुख कुटुंब.
- दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब.
अपात्र कोण?
- ज्यांच्याकडे आधीपासून पक्के घर आहे.
- सरकारी नोकरीतील उच्च उत्पन्न गट.
- आयकर भरणारे.
- चारचाकी वाहनधारक (विशिष्ट अटींनुसार).
- शेती जमीन असलेले.
आवश्यक कागदपत्रे
अर्जासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात:
- आधार कार्ड.
- राशन कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- बँक पासबुक.
- आधार लिंक बँक खाते.
- मोबाईल नंबर.
- रहिवासी दाखला.
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
- मनरेगा जॉब कार्ड.
- जमीन कागदपत्रे (लागू असल्यास)
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया
PMAY-G मध्ये अर्ज प्रक्रिया ग्रामपंचायत स्तरावर केली जाते.
१.आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट द्या.
२.ग्रामपंचायत मध्ये असलेले SECC यादी तपासा.ग्रामपंचायत मध्ये SECC यादीत आपले नाव सामाजिक- आर्थिक जनगणना (SECC) यादीत आहे का ते तपासले जाते.
३.ग्रामसेवकांनी सांगितलेल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे जमा करा.कागदपत्रे सादर केल्यावर अधिकाऱ्यांकडून पात्रतेची पडताळणी केली जाते.
४.अधिकाऱ्यांकडून पात्रतेची पडताळणी झाल्यावर पात्र लाभार्थ्यांचे नाव अंतिम यादीत समाविष्ट केले जाते.
५.Geo-taggingघर बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर फोटो अपलोड करणे आवश्यक असते.DBT द्वारे अनुदान जमा.अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते.
PMAY-G चे फायदे
- स्वतःचे पक्के घर.
- आर्थिक सुरक्षितता.
- शौचालय सुविधा.
- महिलांना प्राधान्य.
- DBT द्वारे थेट लाभ.
- पारदर्शक प्रक्रिया.
- ग्रामीण विकासाला चालना.
महत्वाच्या सूचना
- Geo-tagging अनिवार्य.
- प्रत्येक टप्प्यावर घराचे फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.
- आधार लिंक खाते आवश्यक.
- अनुदान मिळण्यासाठी बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
- काम वेळेत पूर्ण करा.
- कामात विलंब झाल्यास पुढील हप्ता थांबू शकतो.
- चुकीची माहिती देऊ नका
- खोटी माहिती दिल्यास लाभ रद्द होऊ शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1. PMAY-G मध्ये किती अनुदान मिळते?
उत्तर: एकूण ₹2,10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
Q2. अर्ज कुठे करायचा?
उत्तर: ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फत.
Q3. शहरी भागातील लोकांना हा लाभ मिळतो का?
उत्तर: नाही, ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी आहे.
Q4. Geo-tagging म्हणजे काय?
उत्तर: घर बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे फोटो शासन पोर्टलवर अपलोड करणे.
Q5. लाभ थेट मिळतो का?
उत्तर: होय, DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होतो.
Q6. शौचालयासाठी वेगळी मदत मिळते का?
उत्तर: होय, ₹12,000 शौचालय प्रोत्साहन दिले जाते.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) 2026 ही ग्रामीण गरीबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. स्वतःचे पक्के घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ₹2,10,000 पर्यंतची मोठी आर्थिक मदत दिली जाते.जर आपण पात्र असाल तर ही संधी नक्कीच गमावू नका. आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधा, कागदपत्रे तयार ठेवा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
योग्य माहिती, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने अर्ज केल्यास आपले स्वतःचे घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.



